Poem of the week: Week Forty Seven.

And here’s the second last poem of December 2014 from Hemant Divate’s poetry book चौतिशीपर्यंतच्या कविता.
बेंबी नसलेला माणूस 
 – हेमंत दिवटे
उंचसखल नाकारांचे पडघम
वाजत आहेत
आणि
आठवणींचा गर्भ वाढतोय चिरंतर
किती वाट पहावी तुझी
हातातली फुले डोळ्यांत उतरलीत
आता नसलेपणाची दुखरी खिडकी उघडून
डोकावून पाहतो तर
हडकुळ्या शब्दांचं
पॅरलाईज्ड शरीर दिसतं
आता कुठल्या इस्पितळात जाऊ?
 
साली दुनियाच बेंबी हरवून बसलेली
मला आता
कुणाविषयीच वाटत नाही प्रेम
तिरस्कारही नाही
आणि म्हणूनच
मी झिडकारतो तिची स्पर्शलिपी
स्तनांवरून बेंबईवरून अतोनात सळसळणारी कविता
 
आता थोडं चाललं की 
तिचं नसलेलं गाव लागेल
मग मे मनाला झालेला एड्स बरा करून घेईन
विचारांना भोकं पाडून
त्यात स्क्रू पिळून घेईन
पण आता
कुणाची आठवण नाही काढायची
आता चंद्राची पुडी बांधून
निंबोणीच्या झाडाखाली पुरून ठेवायची.
***
Advertisements

Poem of the week: Week Forty Six.

This is the second poem from stolen time: December 2014. It is from Hemant Divate’s poetry collection चौतिशीपर्यंतच्या कविता. 

स्पर्श
– हेमंत दिवटे  
 
मी वेडातून गेलोय वेडावून
अशी तुझ्या स्पर्शांची गस्त प्राणाभोवती
तुझा अधाशी स्पर्श
कापत राहतो देहस्वर सपासप
अन्
मी मनाच्या वेदनेने फोडून काढतो
स्वप्नाचे हात
तर एक एक जखम
वाहत राहते शरीरातून
हा मरण आकांत स्वप्नांचा
ज्याची अतोनात वाढलेली नखं
घुसत राहतात वसनेत
आणि वेडा होऊन मी
धावत सुटतो
तुझ्या शरीरातून.
 
***

Poem of the week: Week Forty Five.

For December 2014, I had read Hemant Divate’s चौतिशीपर्यंतच्या कविता, a book of poems in Marathi. The year’s gone but the poems remain to be shared. Here’s the first one:

मी
– हेमंत दिवटे

मी
विस्मरत जातोय
मला 
उरत नाही कुठलाही रंग रूप भाषा स्पर्श आणि अर्थ
मला
उरत नाही
ईश्वर आई बाप नातीगोती
मला उरत नाही
जात पात धर्म देश भाषा लिपी
श्वास मन शरीर आणि आत्मा
मी पोहोचतोय
जन्म आणि मृत्यूच्या पल्याड
मला
माहीत नाही मी
जन्मतोय की मरतोय
की पोहोचतोय कुठल्याशा
अनाकलनीय समाधीत
मी
नसलेल्या.
***